Breaking News

दररोज 100 भुकेल्यांना अन्नदान

कर्जत शहर भाजपचा स्तुत्य उपक्रम

कर्जत ः बातमीदार

कर्जत शहरातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार आणि मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या एकवेळच्या भोजनाची तारांबळ झाल्याचे पाहून कर्जत शहर भाजपने दररोज 100 भुकेल्या लोकांना जेवण आणि धान्यवाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केला. तसेच त्यांनी भाजप नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी समाजातील आदिवासी, बेघर, बिल्डिंग मजूर कामगार यांच्यासाठी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन गेली 15 दिवस सेवाकार्यात सातत्य ठेवून कर्जत नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष मंदार मेहेंदळे,  तालुका सरचिटणीस राजेश भगत, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, विजय जिनगरे, सूर्यकांत गुप्ता, समीर सोहोनी, दिनेश भरकले, स्नेहा गोगटे हे पदाधिकारी दररोज 100 व्यक्तींना दुपारचे भोजन देतात. तसेच जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटपही त्यांनी सुरू ठेवले आहे. लॉकडाऊनच्या पुढील काळातसुद्धा हा उपक्रम अखंड सुरू राहणार आहे. या उपक्रमाची दखल घेऊन कर्जत बोहरी समाज, रोटरी क्लब, किराणा संघटना यांनीही यासाठी सहकार्य केले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply