Breaking News

ट्रँक्विल ग्रुपकडून मदत

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्‍या गोरगरीब कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून परिवर्तन सामाजिक विकास संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील व ट्रँक्विल ग्रुपच्या कर्मचार्‍यांनी  माणुसकी दाखवत या संकटग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजापूर येथील बांधकाम कामासाठी बाहेरून आलेल्या 35 मजुरांना 10 दिवस पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. या वेळी ट्रँक्विल ग्रुपचे अमोल मगदूम, पोपट माने, प्रमोद शिंगाडे, स्वप्निल मयेकर, गणेश मयेकर आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply