Breaking News

मुरूड नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर टनेलची उभारणी

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मुरूड नगर परिषदेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार नगरपालिका कार्यालय, मुख्य बाजारपेठ, मच्छी मार्केट या ठिकाणी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहेत. सॅनिटायझर टनेलची सुरुवात सामान्य नागरिकाकडून करण्यात आली. या टनेलमधून औषधयुक्त पाण्याच्या सूक्ष्म कणांचा फवारा व्यक्तीवर मारला जातो. या आत्याधुनिक मशिनमध्ये 500 लिटरची पाण्याची टाकी लावून त्यामध्ये पॉलिमेरिक बेक्युनाइड हायड्रोक्लोराइट वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यामुळे सहा सेकंदांत निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुरूड शहरात येणार्‍या नागरिकांसह अधिकारी-कर्मचार्‍यांना यामुळे कोणत्याही व्हायरसची बाधा होणार नाही. या वेळी पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर, मुरूड-जंजिरा नगर परिषदेतर्फे ओएस परेश कुंभार, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, आरोग्य विभागाचे अधिकारी राकेश पाटील, पोलीस नाईक रसाळ, ट्रॅफिक हवालदार एन. एन. वाघमारे, ट्रॅफिक पोलीस शिपाई मधुकर माडवे, वरिष्ठ लिपिक प्रकाश आरेकर आदी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर टनेल उभारून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगर परिषद नगराध्यक्ष स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे या वेळी नागरिकांनी आभार मानले.

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूला पिटाळून लावण्यासाठी नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर  टनेल उभारण्यात आले आहे. या सॅनिटायझर टनेलमध्ये नागरिकांनी सहा सेकंद उभे राहून कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहावे.

-रंगराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply