Breaking News

माणगाव मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी मोर्बा उपसरपंच इकबाल हर्णेकर, अल्ताफ धनसे, फाऊंडेशनचे सचिव मौलाना अब्दुल सलाम राऊत, कार्यकारिणी सदस्य जहीर धनसे, निजामुद्दीन राऊत, पोलीस पाटील उस्मान धनसे, बशिर किरकिरे, इम्रान राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply