Breaking News

निरंकारी मिशनची गरजूंना मदत; पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाखांची मदत

मुंबई : प्रतिनिधी

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनचेप्रबंधक आणि सेवादार भक्तगण कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील लक्षावधीबंधु-भगिनींची सेवा करत आहेत.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या अनेक कुटुंबांचे हाल होत आहे, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी  मिशनचे भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदत कार्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांनी लाखो लोकांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. या व्यतिरिक्त दररोज सुमारे एक लाख लोकांना ताजे जेवण (लंगर) वितरीत केले जात आहे. देशभरात सुमारे एक लाखाहून अधिक कुटुंबांना आतापर्यंत हे राशन वाटप करण्यात आले आहे. मिशनच्या वतीने माननीय पंतप्रधान सहायता निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून महाराष्ट्रासह, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आदि राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रत्येकी 50 लाख रूपये इतके अर्थसहाय्य दिलेले आहे. मिशनच्या या महान मानवतावादी सेवेचे पंतप्रधान यांनी ट्वीटरद्वारे कौतुक केले असून संबंधित मुख्यमंत्री महोदयांनीही मिशनच्या योगदानाची प्रशंसा केली आहे. मिशनच्या कित्येक शाखांकडूनपोलीस विभाग, आरोग्यविभाग प्रशासकीय सेवांमध्ये संलग्न असलेल्या कर्मचार्‍यांसहितगरजू लोकांना भोजन आणि चहापान देण्याची सेवा करत आहेत.मिशनच्या जबलपुर शाखेने 4200 मास्क तयार करुन संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply