Breaking News

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; खारघरमधील प्रकार, महिलेने केली तक्रार

पनवेल ः प्रतिनिधी

शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात खारघरमधील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली असून घरकाम करणार्‍या या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खाजगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बबन पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व विद्यमान सल्लागार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी खारघर शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवासी असून ती पतीपासून विभक्त आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने मित्रासोबत काढलेले सेल्फी फोटो शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी व्हायरल केले तसेच या फोटोसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शहरप्रमुखांचा प्रताप असा मेसेज टाकला. संबंधित मेसेज आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजल्यानंतर या घटनेचा जाब विचारण्यासाठी पीडिता शंकर ठाकूर यांच्या घरी गेली असता ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी महिला आणि तिच्या मित्राचे फोटो बॅनरवर झळकवून बदनामी करण्याची धमकी दिली असल्याची नोंददेखील पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानीत आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply