पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीचा उपक्रम
चौक : रामप्रहर वृत्त
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीने माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत गुरुवारी (दि. 21) चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.
कोरोनाच्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी व सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीने गुरुवारी चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे करण्यात आले. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बिर्ला कार्बन कंपनीचे पवनकुमार झा, विनयजी अग्रवाल, सीएसआर प्रमुख लक्ष्मणजी मोरे, संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनिल बडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक, गायकवाड सर यांच्यासह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद वरुडे यांनी आभार मानले.