Breaking News

गर्दुल्ले आणि मद्यपींचा मुक्काम

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील नवीन पादचारी पुलाचा घेतला ताबा

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात कर्जत एन्डकडे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाची कामे अर्धवट असल्याने प्रवासी पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला असून तेथे त्यांचा मुक्काम देखील वाढला आहे. मुंबई उपनगरीय लोकलचे भिवपुरी रोड या स्थानकात पूर्वी एक पादचारी पूल होता. 2018 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भिवपुरी रोड स्थानकातील प्रावसी यांची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे. कर्जत एन्डकडे पादचारी पूल असावा या मागणीसाठी स्थानिक प्रवासी संघटनेने नवीन पादचारी पूल मंजूर केला असून त्या पुलाची मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली आहेत, मात्र वीज जोडणी, सीसीटीव्ही कॅमेरा, इंडिकेटर आदी कामे अर्धवट असून ती कामे पूर्ण करावीत, अशी सूचना प्रवासी संघटना सातत्याने करीत आहे, मात्र गेले दोन महिने झाले, तरी त्यातील कोणतेही काम मध्य रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले नाही. त्यामुळे पुलावरून प्रवासी वाहतूक देखील सुरू होऊ शकली नाही. या पुलाच्या निर्मितीमुळे डिकसळ, उमरोली, गारपोली, पाली वसाहत, बार्डी, वावे या भागातील रहिवासी रूळ न ओलांडता सुखरूप पलीकडे जाऊ शकतात, परंतु गेली अनेक वर्षे रूळ ओलांडताना अपघात झाले आहेत, ही बाब लक्षात घेऊन प्रवासी संघटना पादचारी पुलासाठी आग्रही होती. पादचारी पुलाची निर्मिती झाली असून कामे अर्धवट असल्याने पुलावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे सध्या या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला आहे. अनेक भिकारी तर रात्रदेखील त्या पादचारी पुलावर काढत असून सध्या तेथे दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत. याबाबत भिवपुरी रोड येथील प्रवासी संघटनेने आपली बाजू कर्जत येथील रेल्वे प्रवाशांचे सल्लागार पंकज ओसवाल यांना आपली बाजू मांडण्याची सूचना केली. त्यानुसार ओसवाल यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक यांना पत्र लिहून आपली समस्या मांडली आहे. त्याबाबत मध्य रेल्वेच्या वतीने देखील गंभीर दखल घेण्यात आली असून आता कर्जत आणि नेरळ स्थानकातील आरपीएफ जवान हे रात्री भिवपुरी रोड येथे फेर्‍या मारून गर्दुल्ले यांचा बंदोबस्त करणार आहेत, तर तिकडे वीजपुरवठा आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांची देखील तत्काळ व्यवस्था करण्याची सूचना पीडब्लूआय विभागाला देण्यात आली असल्याची माहिती पंकज ओसवाल यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply