Breaking News

कर्जत भाजप तालुकाध्यक्षांकडून धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भाजप अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी 200हून अधिक गरीब, गरजू तसेच मजूर कुटुंबांना धान्य वाटप केले. या वेळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी  केले. पायरमाळ, गणेशनगर, समाधाननगर, चिंचआळी भागातील गरजूंच्या घरी जाऊन त्यांनी नेरळ ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे, संतोष शिंगाडे, राजन लोभी तसेच प्रकाश पेमारे यांच्या उपस्थितीत ही मदत पोहचविली. त्याचवेळी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मदत उभी करण्याचे आवाहनही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply