नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने व एज्यु-टेक कोचिंग क्लासेस, व्हेरल इव्हेंट्स आणि एचआर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तळोजा फेज 1 येथे विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.
होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत शेकडो सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात अनेक तरुणांनी नोकरी गमावली. त्यांना मदत म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामुळे बँका आणि अन्य कॉर्पोरेट्ससारख्या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना नोकरी मिळण्यास मदत झाली.
या रोजगार मेळाव्याला आरडीआर इव्हेंट्स, व्हॉट यू टेक, पेनपिक्सल, फॉर्च्यून इव्हेंट्स, मास्टर्स इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, इन्स्पायर अॅकॅडमी, ब्लू स्काय एंटरप्रायजेस आणि ग्लोज सॅलून या कंपन्यांनी प्रायोजित केले होते.