Breaking News

युतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा

खोपोली शहर भाजप कार्यकारिणी सभेत आवाहन

खोपोली : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून युतीच्या उमेदवाराला शहरातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याकरिता भाजपचे खोपोली शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सभा झाली. या सभेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्यांने कामाला लागून बुथवर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी या वेळी केल्या. सभेत संघटनात्मक  बाबींवरही चर्चा करण्यात आली.

पक्षाच्या खोपोली शहर चिटणीसपदी दिलीप देशमुख, संजय म्हात्रे, खजिनदारपदी प्रमोद पिंगळे, कार्यालय प्रमुख सुरेन जाधव, महिला विभागीय संघटक सुनीता महर्षी, गीता मोहिते-पाटील यांची  नियुक्ती करण्यात आली. त्यांना या सभेत नियुक्तीपत्रे देण्यात आली.

हास्यक्लबचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई तावडे यांचा, तर हास्य क्लबचा लावणी पुरस्कार मिळाल्याबद्दल पक्षाच्या सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षा कवियित्री उज्ज्वला दिघे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सचिन मोरे यांची ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सचिन मोरे यांचाही या सभेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपचे खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार यांच्यासह पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष, नगरसेवक, तसेच महिला मोर्चा, युवामोर्चा व विविध सेलच्या प्रमुख पदाधिकार्‍यांबरोबर कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply