Breaking News

उमरोलीच्या सरपंचपदी सुनीता बुंधाटे बिनविरोध

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील उमरोली ग्रुपग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदावर शिवसेनेच्या सुनीता बुंधाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविता पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पीठासन अधिकारी माणिक सानप यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी उमरोली गावातून निवडून गेलेल्या शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या सुनीता पंढरीनाथ बुंधाटे यांचा एकमेव अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाला होता. त्यामुळे विशेष सभेत सुनीता बुंधाटे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी सानप यांनी जाहीर केले. त्या विशेष सभेला ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश भासे, सदस्य सुनीता पाटील, विशाखा दाभणे, मोनिका साळोखे, मेघा लोंगले, तनुजा गायकवाड, महेंद्र ठोंबरे, गजानन वाघमारे, सोपान ठाणगे, ठमी सांबरी, माधुरी गायकर, प्रियांका शेलार, सुनीता बुंधाटे असे सर्व सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच सुनीता बुंधाटे यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दशरथ भगत, पं. स.चे माजी उपसभापती मनोहर थोरवे, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, तालुका संघटक करुणा बडेकर, रेश्मा म्हात्रे, माजी सरपंच सुशीला अहिर, किशोर शितोळे, शरद ठाणगे, लहू श्रीखंडे,  यशवंत लोंगले, संजय यादव, समीर साळोखे, विशाल घारे, दिनेश बुंधाट आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply