Breaking News

रेशन दुकानदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

माणगाव ः प्रतिनिधी – जिल्ह्यातील रेशन दुकानदार कोरोनाच्या अतिप्रसंगातही जीवाची पर्वा न करता धोका पत्करून शासनाकडून येणारे व रेशनकार्डवरील धान्य कार्डधारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळत वाटप करतात, परंतु चुकीची व अर्धवट माहिती घेऊन अनेक लोक, समाजातील जबाबदार घटक हे रेशन दुकानदारांना छळतात. रेशन दुकानदार गावोगावी धान्य वाटप करतात ही जमेची बाजू दुर्लक्षित करून क्राइम ब्रँचचे अधिकारी रेशन दुकानदारालाच पैशांच्या हव्यासापोटी आरोपीच्या पिंजर्‍यात अडकवू पाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील रेशन दुकानदार सामूहिक राजीनामे द्यायच्या मनस्थितीत असल्याचे रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले आहे.

 सरकारी निर्णय सतत बदलतात, पण एखादा जुना जीआर घेऊन काही लोक येतात. त्यातील झालेला बदल लक्षात न घेता योजनेतील नियम, लाभार्थी याबाबत अभ्यास न करता आक्रमकपणे मत व्यक्त करतात. रायगड जिल्ह्यात 1369 रेशन दुकानदार लोकांना धान्य वाटप करतात. मुळात दप्तर तपासण्याचा अधिकार हा पुरवठा विभागाचा असतो, परंतु या सर्व गोष्टी नजरेआड करून दबावतंत्र वापरून रेशन दुकानदारांना बदनाम केले जात आहे, असे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply