Breaking News

नृत्यस्पर्धेत कर्जत इनरव्हील क्लबची बाजी

कर्जत : प्रतिनिधी

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे नुकतेच आयएसओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने सहा बक्षिसे पटकावून बाजी मारली आहे. या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने दुसर्‍या क्रमांकाचे, तर सर्वोत्तम ड्रेससाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या फॅशन शो स्पर्धेसाठी करुणा पराडकर यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यांनी जिजामातेची व्यक्तिरेखा साकारली होती. फ्लेवर ऑफ क्वीन या स्पर्धेच्या रॅम्प वॉकमध्ये मोनिका बडेकर यांना द्वितीय क्रमांकाचे, तर त्यांनी स्पर्धेमध्ये घातलेल्या सिंड्रेला शूजसाठी विशेष बक्षीस देण्यात आले आहे. कर्जत इनरव्हील क्लबला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी अध्यक्षा सुलोचना गायकवाड यांच्यासह क्लबचे अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply