
नवी मुंबई : बातमीदार
बेलापुर अग्रोळी गावात सोसाट्याच्या वार्याने झाड कोसळून चारचाकीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली. कोकण किनारपट्टीवर सलग दोन दिवस ’निसर्ग’ वादळ धडकणार असल्याने सकाळपासून नवी मुंबईत सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. या वार्यांमुळे सेक्टर 29 येथे उद्यानातील हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे अरुंद असलेला संपूर्ण रस्ताच बंद झाला होता. उद्यानाच्या बाजूलाच उभ्या असलेल्या चारचाकी कारवर थेट हे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले. पावसामुळे नागरिक लहान मुले घरी असल्याने सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून हे झाड हटवण्यात आले व रस्ता मोकळा करण्यात आला.