Breaking News

गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा -जगदिश कुलकर्णी

उरण : वार्ताहर – उरण शहर व आसपास खेड्यातील लोकांनी ज्या वेळी भाजीपाला, मांस, मच्छी किंवा किरणा खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे.प्रत्येकाने आपली स्वताची काळजी घेतली पाहिजे. एखादा नागरिक कोरोनाबाधित झाला असेल कोरोनाचा संसर्ग दुसर्‍यांना होऊ नये या दृष्टीकोनातून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, त्यासाठी  सोशल  डिस्टन्सिंग ठेवा जेने करून, कोरोना संसर्ग होणार नाही.

सर्व कुटुंब प्रमुखांनी बाजारात जाते वेळी आपल्या घरातील वयोवृद्धय व 18 वर्षा खालील मुलांना नेऊ नये दोन कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाजारात जावे जेणे करून गर्दी होणार नाही. गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे जेणे करून कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव होणार नाही, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply