Breaking News

आशा वर्करच्या दक्षतेमुळे विचुंबेतील ‘त्या’ रुग्णाचे कोरोना निदान

पनवेल : प्रतिनिधी – विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असताना ही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असताना आशा वर्कर अर्चना भोईर यांच्या दक्षतेमुळे हा रुग्ण आढळला. त्यामुळे अनेकांचा संसर्ग टळल्याची माहिती गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामपंचायतहद्दीत आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांचेकडून परिसरात सर्व्हे करण्यास सांगितले आहे. पनवेल तालुक्यात उपविभागीय अधिकारी दत्ता नवले यांचे  मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कर्मचारी विचुंबे येथील पुष्प व्हॅलीमध्ये 10  एप्रिल रोजी सर्व्हे करीत असताना आशा वर्कर अर्चना भोईर आणि अंगणवाडी सेविका त्याठिकाणी गेल्या असता  या व्यक्तीच्या मुलांनी आपल्या वडिलांना डोके दुखी, अंगदुखणे आणि ताप येत असून त्यांनी दोन दिवस डॉक्टर महाजन यांच्याकडून औषधे घेऊन ही त्यांना बरे वाटत नसल्याची माहिती दिली. त्यांच्या डिटेल्स घेऊन आशा वर्कर अर्चना भोईर यांनी ही माहिती ग्रामविकास अधिकारी चवरकर यांना दिली.

त्यांनी तातडीने  पत्र देऊन त्याला  उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे जाण्यास सांगितले पण तो गेला नाही. पनवेलला उप जिल्हा रुग्णालयात 12 तारखेला तो तपासणीसाठी गेला. तेथे तापाची आणि अशक्तपणावर औषधे देऊन त्याला खारघरला जाण्यास सांगितले पण तेथे न जाता तो घरी आला. त्याकाळात दूध आणि अंडी आणण्यासाठी बाजारात जात होता. ताप कमी न झाल्याने 16 तारखेला सायंकाळी त्याला ग्रामविकास भवन खारघरमध्ये  दाखल करून नमुने घेऊन तपासणीला पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट 18 तारखेला पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर 19 एप्रिलपासून पनवेलच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा दोन्ही मुलांना ही खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण 21 मार्चला तामिळनाडूतून विचुंबेला आला होता. 3 ते 8 एप्रिल दरम्यान तो एसटीने पनवेलहून मुंबईला बीपीटीच्या कार्यालयात जात होता. पहाटे भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीला ही जात होता. 

विचुंबे येथील मूळच्या तामिळनाडू मधील या व्यक्तिने लक्षणे दिसत असताना ही वेळीच खारघरच्या ग्रामविकास भवनात दाखल न होता तो घरी राहिला. दूध आणि अंडी खरेदीसाठी तो सकाळी जात होता. त्याने उपचार घेतलेले डॉक्टर महाजन, त्याच्या कार्यालयातले सहकारी, बरोबर प्रवास केलेले आणि त्याची मुले यांच्या तो संपर्कात असल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. संसर्गा झालेले नागरिक वेळेवर उपचार घेण्यास तयार नसल्याने धोका निर्माण होत असल्याचे ही या वेळी दिसून आले आहे.   

विचुंबे येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यापासून गावात नवीन  आलेल्या व्यक्तींना सरपंच, पोलीस पाटील तसेच सोसायटीमध्ये कोणी नवीन आल्यास सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे सकाळपासून अशा व्यक्तींची गर्दी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. हे चांगले आहे पण त्यामुळे अर्धावेळ सर्टिफिकेट देण्यातच जात आहे.

– डॉ. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र, आजीवली

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply