Breaking News

‘त्या’ घटनेबद्दल धोनीला आजही पश्चाताप!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले गेले. भारताचा डाव कोसळला असताना धोनीने संयमी फलंदाजी करीत शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. धोनी बाद झाला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.
सेमीफायनलच्या सामन्यात धोनीच्या रन आऊटबद्दल आणि त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल अनेकांनी टीका केली, पण या सर्व घटनेवर धोनीने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी धावाबाद झाल्याचे दु:ख अजून माझ्या मनात आहे. तेव्हा मी का उडी मारली नाही? ते दोन इंच मला नेहमी सांगत असतात की, एमएस धोनी तू उडी मारू शकला असतास.
न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. या काळात धोनीच्या निवृत्तीबद्दलदेखील चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी धोनी वनडेमधून निवृत्ती घेत फक्त टी-20 सामने खेळणार असल्याचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार असून, ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात असेल, अशी चर्चा आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply