
खोपोली ः प्रतिनिधी
अपघात असो किंवा अन्य कोणतीही आपत्ती आणीबाणीच्या प्रसंगी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत टीम नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरही टीमचे काही सदस्य मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकरिता पीपीई किटचे वाटप करण्यात आले. तसेच नगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचार्यांनाही असोसिएशनकडून अशा किटचे वाटप करण्यात आले. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अतिक खोत, ज्येष्ठ सदस्य अबू जळगावकर, नगरसेवक व सदस्य निजामुद्दीन जळगावकर व संस्थेच्या अन्य पदाधिकार्यांनी किटचे वाटप केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, आपत्कालीन ग्रुपचे सदस्य अमोल कदम, गुरुनाथ साठेलकर आदी उपस्थित होते.खोपोली शहरात सॅनिटायझर फवारणी, परिसरातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप अशा कामांतही मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात येत आहे.