रेवदंडा, पोलादपूर : प्रतिनिधी
जन शिक्षण संस्थान या संस्थेने अलिबाग तालुक्यातील चौल भाटगल्ली येथे आयोजित केलेल्या काजू उद्योग प्रक्रिया कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यशाळेस प्रतिसाद लाभला.
संस्थेचे संचालक विजय कोकणे, अक्षता जाधव, उद्योजक हर्षदा म्हात्रे, हरेश म्हात्रे, दिगंबर मोरे, अपर्णा मोरे, प्रतिक्षा सचिन चव्हाण यांच्यासह प्रशिक्षणार्थी या वेळी उपस्थित होते.
या पंधरा दिवसांच्या या कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक राहुल जाधव व त्यांचे सहकारी राजू टिवलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काजू संकलनापासून ते पॅकिंग व विक्री व्यवस्थापनापर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.