Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याने चिरनेरकरांची पुरातून होणार सुटका

नाल्याच्या बांधकामामुळे धोका टळला

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील जंगल सत्याग्रहातील ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या चिरनेर वासीयांना मागील कित्येक वर्षांपासून पावसाळ्यातील पाण्याच्या पुराचा फटका बसत होता.  उरणचे आमदार महेश बालदी यांनी या चिरनेर वासीयांना पुराच्या फटक्यातून वाचविण्यासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून मागील वर्षी या नाल्याचे कामाची मंजुरी मिळवून दिली असून, यंदा प्रत्यक्षात या नाल्याच्या बांधकामाला प्रारंभ करून बहुतांशी बांधकाम आटोक्यात आले आहे. त्यामुळे चिरनेर वासीयांनी दरवर्षी होणार्‍या पुराच्या तडाख्यातून सुटका होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून मागील दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर चिरनेर स्मशानभूमीपासून ते चिरनेर खाडीपर्यंतच्या नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे एक हजार 100 मीटर लांबीच्या या नाल्याच्या सिमेंटीकरणाचे काम प्रगती पथावर असून, पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेल्या या चिरनेर गावातील नाल्याच्या सिमेंटीकरणांच्या संरक्षक भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्यात येण्याचे उद्दिष्ट असल्याचे

पी. पी. खारपाटील कन्ट्रक्शन्स कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील यांनी सांगितले.

तर कित्येक वर्षांपासून पूर्वेकडील उंच डोंगरातील पावसाचे पाणी गावातील नाल्याकाठच्या घरांना शिरून अनेकांचे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन त्यांचे जनजीवन विस्कळीत होत असे. एकदा पावसाळा आला की, या चिरनेर येथील नाल्या काठच्या घरातील रहिवाशांना पावसाचा जोर वाढल्यास झोपही लागत नव्हती. मात्र या एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या नाल्याच्या सिमेंटीकरण व संरक्षक भिंतीच्या कामामुळे येथील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण

झाले आहे.

या शिवाय या 1100 मीटर लांबीच्या सिमेंटीकरण संरक्षक भिंतीनंतर पुढील असलेल्या चिरनेर खाडीत येल्याच्या खाडी पासून ते उघडीपर्यंत साधारणतः नऊशे ते एक हजार मीटर अंतराच्या खाडीत बर्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ काढण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून खाडीला उतार तयार करून पाण्याचा निचरा योग्यतेने होईल. अशी आशा चिरनेर वासीयांनी व्यक्त केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply