पनवेल : तालुक्यातील कामोठे येथील महिला डॉक्टर व सफाई कामगार तसेच उलवे येथील एका डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तिन्ही रुग्ण हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची पनवेल महापालिका क्षेत्रातील संख्या 42, तालुक्यातील 49, तर रायगड जिल्ह्यातील 61 झाली आहे. कामोठ्यातील सेक्टर 36 येथील महिला मुंबईतील राजावाडी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून, तर सेक्टर 11 येथील महिला मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते. याशिवाय उलवे सेक्टर 23 येथे राहणारा डॉक्टर नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये काम करतो. या सर्वांना रुग्णालयातूनच कोरोनाची लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …