Breaking News

खालापुरातील उंबरखिंडीत विजय दिन साजरा

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभूमी उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई आहे. या विजयी दिवशी छावणी येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, खालापूर पंचायत समिती, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने विजय दिन सोहळा उंबरखिंड छावणी येथे आयोजित करण्यात येतो.

विजयदिनानिमित्त मंगळवारी (दि. 2) उंबरखिंडीत शिस्तबद्ध आणि पारंपरिक खेळाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. त्याचबरोबर पोवाडा, मर्दानी लाठीकाठी खेळांची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. शिव व्याख्याते विवेक भोपी यांनी उंबरखिंडीच्या इतिहासासमवेत छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आणि पारदर्शक राजा म्हणून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडे सादर केले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विजय स्तभांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज व सरनौबत नेताजी पालकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास  गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गटविकास अधिकारी पोळ, विस्तार अधिकारी तांडेल, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, सामाजिक कार्यकर्ते मनीष खवळे, चावणी सरपंच मनीषा निरगुडे, उपसरपंच बाळू आखाडे, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply