Breaking News

बलात्कारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

पेण : प्रतिनिधी

चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी पेण फणसडोंगरी येथील आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पेण नवीन वसाहत फणसडोंगरी येथील चंद्रकांत विष्णू चौधरी याची पीडित मुलीच्या घरी नेहमी ये-जा असायची. 26 जून 2018 रोजी त्याने तिला आपल्या नातवासोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी नेले. तिथे त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करीत बलात्कार केला.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पेण पोलिसांनी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्यायाधीश एस. एस. शेख यांच्यासमोर झाली. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी आठ जणांची साक्ष घेतली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भडकमकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अलिबाग न्यायालयाने शुक्रवारी आरोपी चंद्रकांत विष्णू चौधरी याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply