अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील 70 कुटुंबांनी घेतला लाभ
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या खेड्या पाड्यातील गोरगरिबांना आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगने धान्याचे वाटप करण्यात आले. देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे, त्यामुळे गोरगरीब आदिवासी व हातावर कमावणारे गोरगरीबांचे बांधवांचे अतोनात हाल होत आहेत. याची दखल घेत पेण-सुधागड मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले, येथील 70 गोरगरीब कुटूंबांनी याचा लाभ घेतले. या वेळी पेण-सुधागड आमदार रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, ललित पाटील, भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, अतोणे सरपंच रोहन दगडे, निलेश तेलंगे, पत्रकार संतोष उतेकर, सागर मोरे, शिरीष सकपाल, संजय शिंदे, प्रसाद लखिमले, अतोणे ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.