Breaking News

तालिबान्यांनी घेतली अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट

काबूल ः प्रतिनिधी

तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची भेट घेतली. या वेळी तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनस हक्कानीने अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्व सदस्यांशी आणि हशमतुल्लाह शाहिदीसह निवड मंडळाशी चर्चा केली. या बैठकीला अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नूर अली झाद्रान आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष असदुल्ला खान उपस्थित होते. तत्पूर्वी, माजी कर्णधार असगर अफगाणलाही तालिबानी भेटले होते. आता काही दिवसांनी त्यांनी क्रिकेट संघाशी चर्चा केली. रिपब्लिक वर्ल्डच्या मते, तालिबानच्या नेत्याने असगर अफगाणसोबत एक सेल्फीही घेतला.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply