Breaking News

जिल्हाधिकार्यांनी साधला नेटीझन्सशी थेट संवाद

अलिबाग : जिमाका – “कोरोना संकटाचा सामना : रायगड जिल्हा प्रशासनाचा पुढाकार” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी सहभाग घेतला आणि कोविड-19 शी लढण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत राज्यभरातील नेटिझन्सशी संवाद साधला.

इलेट्स टेक्नोमीडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केलेल्या ई-गोव्ह मासिकाद्वारे या वेबिनारचे आयोजन केले होते. याचे संचालन इलेट्स टेक्नोमेडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी व ई-गोव्ह मासिकाचे मुख्य संपादक डॉ. रवी गुप्ता यांनी केले.

कोविड-19चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सुविधा, अन्न व नागरी पुरवठा सुरळीत करण्याच्या उपाययोजना आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन तंत्रज्ञान व नाविन्य कसे वापरत आहेत, याबाबतची माहिती नेटिझन्सना दिली. हे संभाषण फेसबुकवरही थेट प्रसारित करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या, आम्ही नागरिकांमधील सर्जनशील जागरूकता यावर बरेच लक्ष केंद्रित केले. पुष्कळ लोक पुणे आणि मुंबईकडे येत होते. जनता कर्फ्यूनंतरही एक लाखाहून अधिक लोक रायगड जिल्ह्यात परतले, परंतु वेळेवर योग्य ती कार्यवाही करून आम्ही हे सुनिश्चित करू शकलो की, त्यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन केले. आम्ही त्यांच्यासाठी सीक्यूएमएस पच्या माध्यमातून डिजिटल मॉनिटरिंग देखील सुरू केले. आमच्याकडेही लोक परदेशातून परत येत होते आणि कोविड-19चा प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या शासनाने निर्देशित केलेल्या प्रोटोकॉलनुसार त्यांना पुरेसे दिवस वेगळे ठेवणे बंधनकारक केले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी समुपदेशन सत्र व प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply