Breaking News

महिला मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या महिला मोटर सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मोटर सायकल रॅलीतून जनजागृती अभियान राबविण्यात आले.

त्यामध्ये प्रामुख्याने बेटी बचाव, बेटी पढाओ, पर्यावरण वाचवा, प्लॅस्टीक हटवा आणि अनाथ मुक्त भारत करण्याचा संदेश जनमानसात जावा यासाठी ही रॅली काढण्याचे मुख्य उद्दीष्ट होते. बेटी बचावो, बेटी पढाओ यावर पथनाट्य सुद्धा सादर करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार

प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रॅली अतिशय शिस्तबद्ध झाली. पनवेल आणि नवीन पनवेलच्या अनेक भागातून ही रॅली फिरविण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा माधवी कानेटकर, सचिव वैशाली भावे आणि सदस्य यांचा या रॅलीत सहभाग होता.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply