Breaking News

भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा -कृष्णा कोबनाक

माणगाव : प्रतिनिधी – मित्रांनो कोरोनाची दहशत पाहता आपण, भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा, असे अवाहन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचे भाजपचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी केले आहे.

जगात प्रथमच  करोना नावाने एक प्रचंड मोठा संसर्गजन्य रोग आलेला आहे. या महामारीमुळे संपुर्ण जग ठप्प झालेला आहे. हा आजार कधी नाहीसा होईल असे कोणीही सांगू शकत नाही. मात्र हा आजार एका पासून दुसर्‍याला होतो हे माहीत झालेले आहे. म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवले पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या महामारीमुळे आज बहुतांश लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेक लोकांनी, मुंबई सोडून गाव गाठले आहे. तर काही मुंबईत घरी बसून आहेत. भविष्यात पुन्हा सर्व सुरळित होईल व रोजगार सुरू होईल असे समजू नका. आपल्याला आता स्वावलंबी होऊन नव भारत निर्माण करावा लागेल, असे देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करावी लागणार आहे. यासाठी गावातील जाणकार लोकांनी एकत्रित येऊन लोकांना विश्वास देऊन काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदलाव करावे लागणार आहेत. गावाकडे लोकांनी दररोज किमान आठ तास काम करण्याची पद्धती अवलंबून ती पण अंतर ठेवून सुरक्षित स्वच्छ कारभार केले पाहिजे या करिता मार्गदर्शन गावा गावात सुरू करावे. आपले धावते जग पुन्हा रुळावर येण्यासाठी काही काळ लागेल तरी आपण नैसर्गिक शेती, भाजीपाला, कुक्कुटपालन, अशा प्रकारच्या व्यवसाय बाबतीत देखील नियोजन करा, असे आवाहन कृष्णा कोबनाक यांनी तमाम नागरिकांना केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply