Breaking News

रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट

एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ

श्रीवर्धन ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे समुद्रात संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि तब्बल 250 जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनार्‍यावर आणण्यात आली. ही बोट कुठून आली आणि ती कुणाच्या मालकीची याबाबत तपास सुरू आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply