Breaking News

देशात 24 तासांमध्ये 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत या महामारीने 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासांत 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली. देशभरात सात हजार 27 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 22 हजार 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आणि या साथीच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूची संख्या पाहता भारतील स्थिती जगाच्या इतर सर्वाधिक फटका बसलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांच्या तुलनेत चांगली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply