Breaking News

‘काळसेकर’मध्ये ऑनलाइन ’लर्न फ्रॉम होम’

पनवेल ः वार्ताहर

अंजुमन-ए-इस्लाम शिक्षणसंस्थेचे एनबीए मानांकनप्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल लॉकडाऊनच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाइन माध्यमातून अध्ययन-अध्यापनाचा अभिनव उपक्रम राबवत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. काळसेकर पॉलिटेक्निकमधील विविध विभागांचा पदविका अभ्यासक्रम यादरम्यान 85 टक्के पूर्ण झाला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनी घेतलेल्या बैठकीत उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमाचा वापर करून पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रमजान खातीक यांच्या शिस्तबद्ध नियोजनांतर्गत महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मॅकॅनिकल इंजिनीअरिंग आदी विभागांतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लेक्चर्सचे आयोजन करण्यात आले.

गुगल क्लासरूम, विविध अ‍ॅप्स, विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, प्राध्यापकांनी  स्वतः तयार केलेले व्हिडीओ व ऑडिओ नोट्स, पीपीटी, ब्लॉग्स, यू ट्यूब चॅनल्स आदी ऑनलाइन माध्यमांतून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून उजळणीही घेण्यात येत आहे. याबाबतची माहिती एमएसबीटीईला देण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान महाविद्यालयीन डिजिटल लायब्ररीचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यादरम्यान प्राचार्य प्रा. रमजान खाटीक महाविद्यालयीन विद्यार्थी संसद, वर्गप्रतिनिधी आदी विद्यार्थ्यांशी डिजिटल माध्यमातून नियमित संवाद साधत अभ्यासक्रमपूर्तीबाबत मागोवा घेत आहेत.  अंजुमन-ए-इस्लाम, नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुर्‍हाण हारीस, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनूतागी, काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणार्‍या या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply