Breaking News

बँकेचा सायरन वाजल्याने पोलिसांची धावपळ

पेण ः प्रतिनिधी

पेण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रचा सायरन रविवारी दुपारी अचानक वाजल्याने पोलिसांची व नागरिकांची एकच धावपळ झाली. तांत्रिक बिघाडामुळे हा सायरन

वाजल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. बँकेजवळच डीवायएसपी ऑफिस असल्याने डीवायएसपी नितीन जाधव यांनी त्वरित सायरन वाजल्याची दखल घेऊन पोलीस कर्मचार्‍यांना बँकेजवळ जाण्यास सांगितले. बर्‍याच वेळाने बँकेच्या अधिकार्‍याने सायरन बंद केला. तोपर्यंत पोलीस हवालदार प्रतीक सावंत आदी कर्मचारी बँकेजवळ उभे होते.

पेण शहरात दुपारच्या वेळेला नगरपालिका चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच भागात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. रविवार असल्याने बँक बंद असताना अचानक बँकेतील सायरन वाजला.त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply