Breaking News

चिरनेरचे मूर्तिकार आर्थिक संकटात

चिरनेर : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील चिरनेर कलानगर येथील मूर्तिकार भाई चौलकर, विलास हातनोलकर, नारायण चिरनेरकर विषणू चौलकर तसेच अन्य मूर्तिकारांनी यावर्षी लवकरच शाडू मातीपासून बनविलेला इकोफ्रेंडली गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार केल्या आहेत. या मूर्तींना घाऊक मागणी असून मागणीप्रमाणे येथील मूर्तिकांरानी  गणेश मूर्ती तयार केल्या आहेत, मात्र कोरोनाच्या विषाणूमुळे शाडू मातीची आवक थांबल्यामुळे मूर्ती तयार करण्याचे कामही थांबले आहे. कोरोनाच्या संकटामुळे येथील कारागीरांचा या व्यवसायावर सध्या सावट पसरलेल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर शेतातील काळ्या चिकन मातीपासून मातीची वेगवेगळ्या आकाराची स्वयंपाकाची भांडीही येथील कलानगरमध्ये तयार करण्यात येत आहे. परंतु सध्या कोरोनाच्या सावटामूळे गाहकच खरेदीसाठी कारखान्यात येत नसल्यामुळे येथील कुंभार समाजाला आर्थिक संकटाला तोंड दावे लागत आहे, अशी माहिती चिरनेर कलानगरमधून पुढे आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply