Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 13वा वर्धापन दिन बुधवारी (दि. 7) उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
याचबरोबर कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, युवा मोर्चा खारघर शहराध्यक्ष नितेश पाटील, शुभम पाटील, मुख्याध्यापिका राज अलोनी, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर आदी उपस्थित होते.
या वेळी कौन्सिल मेंबर्सना लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या हस्ते मुख्य पद, सहाय्यक पद, उपसहाय्यक पद अशी पदे क्षैक्षणिक वर्ष 2024-25साठी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रार्थना गीत, स्वागत गीत, भारूड गीत तसेच मनोरजनांची गीते सादर झाली. कार्यक्रमात माझी शाळा सुंदर शाळा हे गीत विद्यार्थ्यांनी लेखन, गायन, संगीतात प्रस्तुत केल्यामुळे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ते यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या उत्कृष्ट शिक्षकांना पारितोषिके बहाल करण्यात आली.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply