Breaking News

उरणमध्ये पोलीस, पत्नीनंतर आता मुलीलाही कोरोना

उरण : बातमीदार

उरण मोरा येथील पोलिसाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या पत्नीलाही संसर्ग झाला होता. आता त्यांच्या 11 वर्षीय मुलीचाही कोरोना रिपोर्ट रविवारी (दि. 3) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सात झाली आहे. उरण तालुक्यात चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन उरलेला एक जणही बरा होण्याच्या मार्गावर होता, मात्र मोरा येथील वास्तव्यास आणि मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर त्याच्या पत्नीला संसर्ग झाला. या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply