Breaking News

रमजानमुळे फळांची आवक वाढली

उरण : वार्ताहर – सध्या रमजान महिना सुरु झाला आहे. या काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच फळांना मागणी वाढली आहे. अनेक दिवस फळ विक्रीला मरगळ आली होती. रमजानमुळे फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

रमजान काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई, मोसंबी, संत्र, डाळिंब, सफरचंद, चिकू आदींना विशेष मागणी असते. कलिंगडाच्या सर्वत्र गाड्या दिसत असल्याने मागणी वाढत आहे .

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्या करिता उरण व्यापारी असोसिएशन, उरण तहसिल, उरण नगरपरिषद यांच्याकडून उरण वासियांसाठी एन. आय. हायस्कूल मैदान, सेंटमेरी शाळेचे मैदान येथे फळ खरेदी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

कलिंगड 40 रुपयांपासून 70 रुपयांपर्यंत या दराने विकले जातात. टरबूज 50 रुपये किलो, सफरचंद 170 रुपये ते 180  रुपये किलो, मोसंबी 60 रुपये किलो, डाळिंब 70 रुपये किलो, द्राक्षे 80 रुपये ते 100 रुपये किलो या दराने विकले जातात, असे फळविक्रते सुभाष राठोड यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply