वावंढळ येथे वृक्षप्रेमीचा पुढाकार
मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळातच नव्हे तर नेहमीच वृक्षसंवर्धन कामात वेस्त असलेले रामदास काईनकर यांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यास सुरुवात केल्याने, लावलेली झाडे बहरण्यास सुरुवात झाली.
वावंढळवाडी येथील कृषीउद्योजक व वृक्षप्रेमी रामदास काईनकर यांनी गेली काही वर्षे झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सद्या लॉकडाऊन असल्याने अनेक कामे बंद आहेत. रामदास यांनी अनेक झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न देखील केला आहे, वावंढळवाडी परिसरात अनेक झाडे उभी आहेत. आता लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्याची गरज असल्याने स्वतःच्या गाडीत पाणी साठवून टाक्या ठेऊन त्यातून पाईपद्वारे ते झाडांना पाणी देत आहेत.
लावलेल्या झाडांना काहीजण जाणीवपूर्वक आग किंवा तोडली जात असल्याचे त्यांनी सांगून दुःख वेक्त केले. वृक्षसंवर्धनमुळे उन्हाळ्यात आल्हाददायक व नेत्रसुख मिळते. वनसंपदा ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, वृक्षसंवर्धनाची व संरक्षणाची जबाबदारी सर्वांनी घेतल्यास हरितक्रांती सुरू होईल, हा हेतू पुर्णत्वास गेल्यास उज्वल भविष्य असेल. असेही ते म्हणाले.