Breaking News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीकेटी’त शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 31)झाला.

या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण पसारक संस्थेचे संचालक संजय भगत, शाळा समिती सदस्य जयराम मुंबईकर, जे. वाय. वावडे, मुख्याध्यापिका इंदूमती घरत, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंगजी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका अय्यर, इंगजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोटटीयन, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे सर्व शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमात सेजल पाटील, तेजस्वी जाधव, श्रीजल अग्रवाल या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवतात ते सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांमधून मिलिंद सुरवाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका इंदूमती घरत यांनी विद्यार्थ्यांना जीवनामधील वेळेचे नियोजन (ढळाश चरपरसशाशपीं) कसे करावे व परीक्षा दालनामध्ये जाताना या विषयावर मार्गदर्शन केले. आत्मविश्वासपूर्वक जावे असे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष, उपकार्याध्यक्ष व संचालक मंडळ आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक संजय भगत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जीवनामध्ये वेळेचे नियोजन महत्वाचे आहे, असे सांगितले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply