Breaking News

कळंबोलीत शिवजयंती साजरी

पनवेल : वार्ताहर

कळंबोली शहर शिवजयंती उत्सव 2019 या मंडळाच्या माध्यमातून सेक्टर 1 येथील शिवाजी महाराज मैदानात मंदिर येथे नागरिकांनी एकत्र येऊन एक शहर एक रॅली काढली. डोक्यात हेल्मेट घालून वाहने चालवावी व अपघातापासून आपले संरक्षण करावे हा संदेश 150 वाहनचालकांनी कळंबोली पोलिसांच्या सहकार्याने डोक्यात हेल्मेट घालून रॅलीत सहभागी होत दिला. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीत 150 दुचाकीस्वार, 20 रिक्षाचालक, 40 सायकलस्वार आणि 10 चारचाकी गाड्यांचा समावेश होता. रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे धूम्रपान न करता वा गाडीचा हॉर्न न वाजवता शिस्तबद्ध उपक्रम राबविला गेला. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सकल कळंबोली शहर शिवजयंती उत्सवात सोपान मोरे, किरण जाधव, विनोद कुलकर्णी, स्वप्नील रुपनवर, अमित सोलनकर, सचिन झुंझारराव, अजय सूर्यवंशी, सुनील उतेकर आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply