Breaking News

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून प्रकाश देसाई पुन्हा शिवसेनेत

पाली : प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत यूटर्न घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे. प्रकाश देसाई यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हा ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली. गेली पाच महिने  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेचे नेते खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि प्रकाश देसाई यांची चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश देसाई यांच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेशाने अनंत गीते यांना निवडणुकीत फायदा होणार हे निश्चित. मी दोन अडीच महिन्यापूर्वी शिवसेनेतून तडकाफडकी जाण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हाप्रमुखांचा राजीनामा दिला. सुनील तटकरे यांनी माझ्या संपर्कात येऊन माझी मनधरणी  केल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, पण गेल्यानंतर मला दोन ते दीड महिन्यात अनुभव आला की वसंत ओसवाल आदी मंडळी  इतरांना महत्त्व न देणं, गटबाजी करणं, अशा गोष्टी करतात. त्यामुळे मला पश्चाताप झाला. मी केंद्रीय मंत्री गीते यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांसोबत येण्याचा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया प्रकाश देसाई यांनी व्यक्त केली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply