Breaking News

भाजप खारघर मंडलच्या वतीने सेवा समर्पण अभियानअंतर्गत अन्नदान

खारघर : रामप्रहर वृत्त

सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर मंडलात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. या अभियानात सेवा अभियान कार्यप्रमुख व खारघर मंडलाचे उपाध्यक्ष रमेश  खडकर यांच्या वतीने 500 नाका कामगार व गरीब वस्तीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

या वेळी सेवा व समर्पण अभियान प्रमुख व मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे तसेच शिवतेज मित्र मंडळाचे कमलेश मिश्रा, सुनील गायकवाड, बबलू मेहरोलिया, सचिन केदार, प्रदीप पाटील उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply