उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा सुरकीचा पाडा, नवापाडा व कोंढरी आदी ठिकाणी गेल्या चार दिवसांत कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगर परिषदेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून करंजा येथे जंतुनाशक फवारणी सुरू आहे. उरणचे आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही फवारणी केली जात आहे.
याकामी उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, आरोग्य सभापती रजनी कोळी, नगरसेवक कौशिक शाह, रवी भोईर व अन्य नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुका रेड झोन म्हणून घोषित केला आहे. सर्व नागरिकांनी आपापल्या घरीच राहावे व स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …