पनवेल : प्रतिनिधी
कोविड-19 रुग्णांसाठी केंद्र शासनाने सुधारित डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय संस्थात्मक रचनेनुसार ही सुधारित पॉलिसी तयार करण्यात आली असून ही रूग्णांच्या लक्षणाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.
1. सौम्य, अति सौम्य व लक्षणे नसलेले रुग्ण :- ज्या रुग्णांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आले असेल त्यांची दररोज दोन वेळा शरीराच्या तापमानासाठी आणि पल्स ऑक्सीमिटरद्वारे एसपी ओ-2 तपासणी करण्यात यावी. रूग्णाला लक्षणे सुरू झाल्या पासून सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी ताप नसल्यास दहाव्या दिवशी तपासणी करून डिस्चार्ज देण्यात यावा. या रुग्णांना डिस्चार्ज करताना कोविड विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नाही. त्यांना घरी विलगीकरण पुढील सात दिवसांसाठी करणे आवश्यक असल्याच्या सूचना द्याव्यात. त्यांच्या हातावर सात दिवसाचा स्टॅम्प लावण्यात यावा. या रुग्णामध्ये दाखल असताना डिस्चार्ज करण्यापूर्वी ऑक्सीजनचे प्रमाण 95 % पेक्षा कमी आढळून आल्यास रुग्णांना वशवळलरींशव कोविड हेल्थ सेंटरला संदर्भित करण्यात यावे. या रुग्णांमध्ये पुन्हा ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड सेंटर अथवा राज्याच्या 104 टोल फ्री हेल्प लाईनवर संपर्क करण्याबाबत सांगावे. या रुग्णाचा 14 व्या दिवशी आरोग्य कर्मचार्यांनी दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करून त्यांच्यात लक्षणे नसल्याची खात्री करून तशी नोंद करावी.
2. मध्यम लक्षणे असलेले रुग्ण :- वशवळलरींशव कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल असणार्या रुग्णांना डिस्चार्ज देताना करावयाची कार्यवाही. अ) ज्या रुग्णांना तीन दिवस लक्षणे नाहीत. त्यांचे रूम एअरवर ऑक्सीजन सेचुरेशनचे प्रमाण चार दिवसांसाठी 95% पेक्षा जास्त आहे. अशा रुग्णासाठी मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :- माध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांची शरीराच्या तापमानासाठी तसेच ऑक्सीजन सेचुरेशनची तपासणी करावी. ज्या रुग्णांचा तीन दिवसामध्ये ताप कमी झाला आहे. आणि पुढील 4 दिवस त्याचे रूम एअरवर ऑक्सीजन सेचुरेशनचे प्रमाण 95% पेक्षा जास्त असेल त्यांना लक्षणे सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसाला पूर्ण झाल्यावर डिस्चार्ज द्यावा. या वेळी रूग्णाला तापासाठी कोणतीही औषधे न घेता ताप नसणे. श्वास घेण्यासाठी त्रास न होणे आणि ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची आवश्यकता नसणे. त्यांना डिस्चार्ज देताना प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता राहणार नाही. त्यांना घरी सात दिवसाचे विलगीकरणाची सूचना द्यावी. या रुग्णांमध्ये पुन्हा ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड सेंटर अथवा राज्याच्या 104 टोल फ्री हेल्प लाईनवर संपर्क करण्याबाबत सांगावे. ब) ज्या रुग्णांमध्ये ताप तीन दिवसांमध्ये कमी झाला नाही ज्यांना ऑक्सीजनचा पुरवठा वरुन आणि करण्याची आवश्यकता आहे आशा रुग्णांमध्ये त्यांची लक्षणे नाहीशी झाल्यानंतर वरून ऑक्सीजन न लागता ऑक्सीजनचे प्रमाण 95 % किवा त्यापेक्षा जास्त दिवस असावे. 3. गंभीर रुग्ण तसेच रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले रुग्ण (एचआयव्ही रुग्ण/कॅन्सर इत्यादी) :- अशा रुग्णांना डिस्चार्ज देताना करावयाची कार्यवाही. रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे आढळून न येणे. आरटी-पीसीआर पध्दतीने लक्षणे नसलेल्या रुग्णांचा एक नमूना निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. रुग्णाची आरटी-पीसीआरतपासणी लक्षणे कमी झाल्यानंतर करण्यात यावी सर्व रुग्णांना डिस्चार्ज करताना लक्षणे आढळून आल्यापासून डिस्चार्ज करण्या पर्यंतचा कालावधी किमान 10 दिवस आहे याची खात्री करण्यात यावी.