Breaking News

‘मासळी विक्रीकरिता वाहनांना परवानगी द्यावी’

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळी बांधवाना अलिबाग, उरण व तळोजा बंदरावरुन मच्छी विक्रीकरीता ये-जा करण्याकरीता वाहनांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.

नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जारी केले आहे. यामुळे अनेक व्यवसायीकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळी समाजाचे कुटूंब संपूर्णत: मासेमारीवर अवलंबून असल्यामुळे सद्यस्थितीत कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना मासे विक्रीसाठी ये-जा करण्याकरीता मुंबई, अलिबाग, उरण व तळोजे अशा ठिकाणांवरील असलेल्या वंदरावर मासे विक्रीकरीता आणण्याकरीता जावे लागते. मात्र सद्यस्थिती पाहता मुंबई येथे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्याने कोळी बांधवाना मुंबई येथे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना मासे विक्री करण्यासाठी अलिबाग, उरण व तळोजे येथे जाण्याकरीता कोळी बांधवांच्या वाहनांना परवानगी देण्यात यावी जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीस विभागाकडून ये-जा करण्यास अडथळा

निर्माण होणार नाही.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पमपा हद्दीतील कोळी बांधवाना मच्छी विक्रीकरीता मच्छी आणण्याकरीता वाहनांना परवानगी देण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका भोईर यांनी पनवेल तहसिलदार यांना पत्रान्वये केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply