Breaking News

माणगावकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाला दूर ठेवावे; भाजप नेते संजयआप्पा ढवळे यांचे आवाहन

माणगाव : प्रतिनिधी

संपूर्ण जगभर हैदोस घालणार्‍या कोरोना संसर्गजन्य विषाणूला दूर ठेवण्यासाठी माणगाव तालुक्यातील जनतेने सोशल  डिस्टन्सिंगचे (सुरक्षित अंतर) पालन करा, असे आवाहन माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी

केले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ढवळे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या विषाणूपासून देशवासीयांची मुक्तता व्हावी यासाठी सरकार विविध सूचना वेळोवेळी करीत आहे. हा विषाणू गर्दीतून लवकरच फैलावत असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवणे फार महत्त्वाचे आहे. रायगड जिल्ह्यात या विषाणूचा जोर वाढू लागला असल्याने ही रायगड वासियांसाठी धोक्याची घंटा आहे. माणगाव तालुक्यातील जनतेने याकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. माणगाव तालुक्यातील जनतेने चेहर्‍यावर मास्क अथवा रुमाल सातत्याने लावावे. कोठेही गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून उभे रहा. प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करा. हा देशावर आलेला आणीबाणीचा संकट असून या संकटातून सर्वजण लवकरात लवकर बाहेर पडू यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply