Breaking News

मं कीहिल ग्रामस्थांना करावी लागतेय पायपीट

अमृतांजन ब्रिज पाडल्याने गावचा रस्ता झाला बंद

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील  खंडाळा घाटातील अमृतांजन पूल मागील महिन्यात एमएमआरडीएने पाडला, मात्र या ब्रिजवरून मं कीहिल गावाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने व पर्यायी रस्त्याची सुविधा न झाल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोपोली नगर परिषदहद्दीतील दस्तुरी येथून तीन  किमी अंतरावर मं कीहिल गावची वस्ती आहे. ही वस्ती 1927 पासूनची आहे. या गावात जाण्यासाठी ब्रिटिशांनी  त्या काळात अमृतांजन ब्रिजवरून पर्यायी रस्त्याची सुविधा केली होती. हा ब्रिज पडल्याने मं कीहिल गावाचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थाना तीन  किमीची पायपीट करून जावे लागत आहे. याचा मोठा त्रास शाळेतील लहान मुलांना, कामगारांना सहन करावा लागत असून, तेथील कोणी व्यक्ती आजारी पडल्यास तिला झोळी करून खांद्यावर न्यावे लागत आहे. 

मं कीहिल गावात अजूनही वीज रस्ता, पाणी पोहोचलेली नाही. त्यातच येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांची परवड होत आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

गावासाठी एकमेव असणारा रस्ता बंद होणार याची कुठलीही माहिती अगोदर ग्रामस्थांना दिली गेली नाही.  अमृतांजन ब्रिज पाडून एक महिना उलटला तरी अजूनही एमएमआरडीएने गावाला पर्यायी रस्ता दिला नसल्याने  ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

-लक्ष्मण गवारने, ग्रामस्थ

राज्य सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकरात आमच्या गावाला पर्यायी रस्ता करून द्यावा, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.

-अशोक गवारने, ग्रामस्थ

प्राचीन काळापासून येथे वस्ती असून, येथे अजूनही मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. ग्रामस्थांना अंधारात  जीवन जगावे लागत आहे. खोपोली नगर परिषद हद्दीत हे गाव येते, मात्र निवडणुका झाल्या की या गावाकडे लक्ष दिले जात नाही.

-बबन शेडगे, सामाजिक कार्यकर्ते

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply