Breaking News

खोपोली पालिकेचे ऐन पावसाळ्यात डांबरीकरण

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका प्रशासनाला अखेर जाग येऊन खड्डे भरण्यास प्रारंभ केला, पण गुडलक कॉर्नर येथे चक्क पाऊस पडत असतानाही डांबरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने खोपोलीकर आश्चर्यचकित होऊन ङ्गअजब तुझे सरकारङ्घ अशा प्रतिक्रिया उमटल्या तर नवल नाही.

एकेकाळी गर्भश्रीमंत असा नावलौकिक असणार्‍या खोपोली पालिकेत सोन्याचा धूर निघत असे, पण आता कोळशाचाही धूर निघत नाही. खोपोली शहरात दरवर्षी रस्ते सुधारले जातात, पण कामाचा दर्जा घसरलेला असल्याने व टक्केवारीच्या बाजारात रस्त्यात खड्डे पडून दरवर्षी नागरिकांचा कररूपाने जमा झालेला पैसा खड्ड्यात जात आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मार्च, एप्रिल, मे महिना गेल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासन खडबडून जागे होते. तसेच सालाबादप्रमाणे मंगळवारी (दि. 9) गुडलक कॉर्नर येथे नवीन पालिकेच्या इमारतीपर्यंत चक्क डांबरीकरणाचे काम पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वासरंग रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ वाळूमिश्रित सिमेंटने खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने आता नगराध्यक्षांच्या वाहनाचा मार्ग सुकर होणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. शेजारच्या तालुक्यातील कर्जत नगर पालिकेतील सिमेंट-काँक्रीटचे रस्ते खोपोलीत कधी होणार? यासाठी येथील लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का? असा सवाल खोपोलीकर करीत आहेत. दरम्यान, पालिका प्रशासनाने शहरातील सर्व खड्डेही बुजवावेत, अशी मागणी खोपोलीकर करीत आहेत.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply