Breaking News

कुशेडे तर्फे गोवेले येथील परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले येथे सहा व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना रुग्ण राहात असलेला कुशेडे तर्फे गोवेले मूळगाव परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी तथा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply