Breaking News

रायगडात पाणीटंचाईच्या वाढत्या झळा

74 गावे, 239 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्यात आहेत. जिल्ह्यात 74 गावे आणि 239 वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडी तसेच अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उरण तालुक्यातील पाच वाड्यांमधील 998 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील पाच गावे आणि 6 वाड्यांमधील एकूण चार हजार 805 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील तीन गावे, 10 वाड्यांमधील एकूण 1 हजार 560 नागरिकांना दोन खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूर तालुक्यातील एक गाव, चार वाड्यांमधील एकूण एक हजार 550 नागरिकांना एक खाजगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पेण तालुक्यातील 14 गावे व 86 वाड्यांमधील एकूण 22 हजार 250 नागरिकांना सात खाजगी टँकर्स व एका मदतीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील तीन गावे व पाच वाड्यांमधील दोन हजार 262 नागरिकांना एका खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील चार गावे व दोन वाड्यांमधील दोन हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

महाड तालुक्यातील 10 गावे व 62 वाड्यांमधील एकूण 12 हजार 211 नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलादपूर तालुक्यातील 30 गावे व 57 वाड्यांमधील 11 हजार 230 नागरिकांना सहा खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव व दोन वाड्यांमधील 348 नागरिकांना एका खाजगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरूड तालुक्यातील एका गावात 751 नागरिकांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर तळा तालुक्यातील दोन गावांत एक हजार 618 नागरिकांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरूड आणि तळा या 12 तालुक्यांमधील मिळून 74 गावे, 239 वाड्यांमधील एकूण 62 हजार 479 नागरिकांना 31 खाजगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन अशा 33 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply